नवी दिल्ली: भारतीय संघाचा उपकर्णधार विराट कोहलीनं धोनीच्या जागी टेस्ट मॅचमध्ये कोण खेळणार याचा खुलासा केला आहे. दिल्ली डेअरडेविल्ससोबतच्या सामन्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत विराट बोलत होता.
महेंद्र सिंह धोनीनं कसोटीमधून निवृत्ती घेतल्यानंतर त्याच्या जागी विकेटकीपिंग कोण करणार याची सर्वांनाच उत्सुकता होती. मात्र विराटने पत्रकार परिदेत बोलता बोलता स्पष्ट केले की, रिद्धिमान साहा भारतीय कसोटी क्रिकेटचा नवीन विकेटकीपर असणार आहे. विराटने सांगितले की, रिद्धिमान साहाने धोनीच्या गैरहजेरीत चांगलं प्रदर्शन केलं आहे.
विराच कोहलीला जेव्हा विचारण्यात आलं की, कर्णधार पदाच्या जबाबदारीने खेळावर काही परिणाम होईल का? तेव्हा विराटने सांगितले की, मी खेळावर लक्ष केंद्रीत करेल. त्यामुळे माझा खेळ अधिक चांगला होईल.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.