४४ चेंडूत ९ चौकार, १६ षटकार, १४९ रन्स

दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेटर डी व्हिलियर्सने तडाखेबाज फलंदाजी केली आहे. या फलंदाजीनंतर तो सर्वात वेगाने अर्ध शतक आणि शतक करणारा खेळाडू ठरला आहे.

Updated: Jan 19, 2015, 03:12 PM IST
४४ चेंडूत ९ चौकार, १६ षटकार, १४९ रन्स title=

जोहान्सबर्ग : दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेटर डी व्हिलियर्सने तडाखेबाज फलंदाजी केली आहे. या फलंदाजीनंतर तो सर्वात वेगाने अर्ध शतक आणि शतक करणारा खेळाडू ठरला आहे.

एबी डी विलियर्सने रविवारी जोहान्सबर्गच्या वांडरर्स मैदानावर ही जबरदस्त खेळी केली. डी विलियर्सने वनडेच्या क्रिकेट इतिहासात दोन-दोन जागतिक रेकॉर्ड केले.

शतकाचा रेकॉर्ड
डाव्या हाताने खेळणाऱ्या डी विलियर्सने वेस्ट इंडिजच्या बॉलर्सची जोरदार धुलाई केली, पहिल्या १६ चेंडूत त्याने अर्धशतक पूर्ण केलं आणि विश्वविक्रम केला.

डी विलियर्सची धडाकेबाज खेळी येथेच थांबली नव्हती. डी विलियर्सने ३१ चेंडूत शतक साजरं केलं. या आधी वनडेमध्ये सर्वात वेगवान शतक बनवण्याचा रेकॉर्ड न्यूझीलंडच्या कोरी एंडरसनच्या नावे होता.

एंडरसनने मागील वर्षी जानेवारी क्वींसलँडमध्ये हा पराक्रम केला होता. योगायोग म्हणजे तेव्हा देखिल एंडरसनने वेस्ट इंडिज विरोधात हा रेकॉर्ड केला होता.

डी विलियर्सने हे जलद शतक पूर्ण करण्यासाठी आठ चौकार आणि १० षटकार लगावले. या शिवाय डी विलियर्सने वनडेच्या एका डावात सर्वाधिक १६ षटकार लावण्याच्या रेकॉर्डची बरोबरीही केली. भारताच्या रोहित शर्मानेही एका डावात १६ षटकार लगावले आहेत.

अर्धशतकाचा रेकॉर्ड
या आधी हा रेकॉर्ड श्रीलंकेच्या सनत जयसूर्याच्या नावे होता, जयसूर्याने १९९६ मध्ये सिंगापूरमध्ये पाकिस्तान विरोधात खेळतांना १७ चेंडूत अर्धशतक बनवलं होतं.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.