नवी दिल्ली : वनडे क्रिकेटमध्ये भारताचा भरवशाचा फलंदाज मानल्या जाणाऱ्या रोहित शर्माच्या मते त्याच्या करिअरला वेगळे वळण महेंद्रसिंग धोनीमुळेच मिळाले.
आंतरराष्ट्रीय वनडेमध्ये सलामीला फलंदाजीला येण्याच्या निर्णयाने माझे संपूर्ण करिअरच बदलले आणि हा निर्णय धोनीने घेतला होता. यानंतरच मी चांगला फलंजाद बनू शकलो. त्यामुळेच मी माझ्या खेळात सुधारणा करु शकलो, असे रोहित म्हणाला.
रोहितने पहिल्या २०१३मध्ये सुरुवातीलच्या इंग्लंडविरुद्धच्या सीरिजमध्ये सलामीवीर म्हणून खेळला होता. या सीरिजमध्ये त्याने ८० च्या जवळपास धावा केल्या होत्या. याबाबत रोहित म्हणाला, त्यावेळी धोनी माझ्याजवळ आला आणि म्हणाला मला वाटते की तु डावाची सुरुवात करावी, कारण माझा विश्वास आहे की तु चांगली कामगिरी कररशील, तुला कट आणि पुल शॉट दोन्ही चांगले खेळतोस. यामुळेच माझे करिअर बदलले, असे पुढे रोहित म्हणाला..