अजिंक्यच्या नेतृत्वाखाली भारत 'अ' विजयासाठी सज्ज

पहिल्या सराव सामन्यात भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली पराभवाचा सामना केल्यानंतर भारत अ संघ आता दुसऱ्या सराव सामन्यात विजयासाठी सज्ज झालाय. या सामन्यात अजिंक्य रहाणे भारताचे नेतृत्व करणार आहे. 

Updated: Jan 12, 2017, 08:41 AM IST
अजिंक्यच्या नेतृत्वाखाली भारत 'अ' विजयासाठी सज्ज title=

मुंबई : पहिल्या सराव सामन्यात भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली पराभवाचा सामना केल्यानंतर भारत अ संघ आता दुसऱ्या सराव सामन्यात विजयासाठी सज्ज झालाय. या सामन्यात अजिंक्य रहाणे भारताचे नेतृत्व करणार आहे. 

ब्रेबॉर्न स्टेडियमवर रंगणाऱ्या या सामन्यात भारत अ संघ विजयाच्या इराद्याने मैदानात उतरेल. पहिला सामना गमावल्यानंतर या सामन्यात अजिंक्यच्या नेतृत्वाची खरी कसोटी लागणार आहे. 

पहिल्या सराव सामन्यात धोनीने नेतृत्व केले होते. मात्र इंग्लंड संघाकडून पराभव मिळाला होता. मात्र सामन्यातील विजय-पराजयापेक्षा धोनीच्या खेळीचा आनंद प्रेक्षकांनी यावेळी लुटला. एरव्ही सराव सामन्यांना तितकीशी हजेरी न लावणाऱ्या प्रेक्षकांनी १० जानेवारीला मैदानात मोठी गर्दी केली होती. 

आपल्या लाडक्या कर्णधाराच्या नेतृत्वाखालील अखेरचा सामना पाहण्यासाठी ही गर्दी होती. संपूर्ण स्टेडियमभर माही माही असा जयघोष सुरु होता. जेव्हा धोनी खेळण्यासाठी मैदानावर आला तेव्हा तर लोकांनी माही माहीच्या जयधोषाने संपूर्ण स्टेडियम दणाणून गेले. 

सामन्याची वेळ : सकाळी नऊ वाजता.