रोहितच्या फॉर्मचं रन्ससोबत काही घेणं-देणं नाही- धोनी

टीम इंडियाचा कॅप्टन कूल महेंद्र सिंग धोनी रोहित शर्माच्या फॉर्मवर फारसा चिंतीत नाहीय आणि त्यानं सांगितलं की, तो किती रन्स करतोय याशिवाय किती दमदार बॅटिंग करतोय, हे पाहणं गरजेचं आहे.

Updated: Mar 16, 2015, 12:50 PM IST
रोहितच्या फॉर्मचं रन्ससोबत काही घेणं-देणं नाही- धोनी title=

मेलबर्न: टीम इंडियाचा कॅप्टन कूल महेंद्र सिंग धोनी रोहित शर्माच्या फॉर्मवर फारसा चिंतीत नाहीय आणि त्यानं सांगितलं की, तो किती रन्स करतोय याशिवाय किती दमदार बॅटिंग करतोय, हे पाहणं गरजेचं आहे.

रोहितनं गेल्या सहा महिन्यांमध्ये ३१.८०च्या सरासरीनं अवघे १५९ रन्स बनवलेत. वनडे क्रिकेटमध्ये दोनदा डबल सेंच्युरी ठोकणारा तो एकमेव बॅट्समन आहे. अनेक मॅचमध्ये त्यानं सुरूवात चांगली केली. पण फक्त दोन मॅचमध्ये त्याला हाफसेंच्युरी करता आली. वर्ल्डकपमध्ये त्यानं यूएई विरुद्ध नॉटआऊट ५७ आणि आयर्लंड विरुद्ध ६४ रन्स केले. 

धोनीनं रोहितची पाठराखण केलीय. धोनी म्हणाला, 'आपल्याला हे सुद्धा पाहायला हवं की टूर्नामेंटमध्ये आम्हाला काही संधींवर लक्ष्याचा पाठलाग करावा लागला आणि विरुद्ध टीम (यूएई, वेस्ट इंडिज) नं अधिक रन्स बनवले नाहीत तर आमचे सलामवीर बॅट्समन मोठा स्कोअर बनवू शकले नाहीत. '

धोनीनं सांगितलं की कोणत्या खेळाडूने किती रन्स बनवले हे पाहण्याऐवजी ते कशाप्रकारे बॅटिंग करतात हे पाहणं गरजेचं आहे. धोनी म्हणतो, 'हे पाहणं महत्त्वपूर्ण आहे की, तो कशापद्धतीनं सुरूवात करतोय. मला वाटतं रोहितनं आतापर्यंत खूप चांगली बॅटिंग केलीय. तो खूप शांत आणि संयमित दिसतो आणि चांगले शॉट्सही मारतो, हे महत्त्वाचं आहे. '

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.