मुंबई : मला ती त्याच्या डोळ्यांत दिसत होती, असं महेंद्रसिंह धोनी म्हणाला, त्यावेळी सर्वांनाच प्रश्न पडला असावा ती कोण, पण धोनीचे वाक्यपूर्ण झाल्यानंतर ती म्हणजे कोण याचा अर्थ अधिक स्पष्ट झाला.
धोनी म्हणाला, 'मला ती त्याच्या डोळ्यांत दिसत होती, कोहलीने धाव काढताना दाखविलेली जिद्द आणि त्याला असणारी विजयाची आस थक्क करणारी होती.', धोनीला विराटच्या डोळ्यात विजयाची आस दिसत होती, असं म्हणायचं होतं.
धोनी विराटशी केलेल्या भागीदारीवर म्हणतो, या धावांमध्ये माझा वाटा फक्त १८ धावांचा होता. धोनी म्हणाला, 'वास्तविक पाहाता खेळपट्टी फलंदाजीसाठी अनुकूल नव्हती. काहीसे आखूड टप्प्याचे चेंडू टोलाविणे कठीण होते. खास करून फिरकी गोलंदाजांविरुद्ध हल्ला चढविणे सोपे नव्हते.
विराट आणि माझी जोडी जमल्यानंतर आम्ही धावा अक्षरशः चोरून काढत होतो. युवराजच्या पायाला दुखापत झाल्यामुळे विराट अशा धावा काढताना हतबल झाला होता. त्यामुळे पुढच्या षटकांत धावांचे आव्हान वाढले. कोहलीने धाव काढताना दाखविलेली जिद्द आणि त्याला असणारी विजयाची आस थक्क करणारी होती. मला ती त्याच्या डोळ्यांत दिसत होती.'