मुंबई : मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर टी२० विश्वचषक स्पर्धेतील पहिल्या गटातील सामन्यात दक्षिण आफ्रिकेने इंग्लंडसमोर २३० धावांचा डोंगर उभा केला आहे. इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी धावांची अक्षरक्ष: लयलूट करत इंग्लंडच्या कर्णधाराचा निर्णय चुकीचा ठरवला.
इंग्लंच्या खेळाडूंनी देखील मात्र सुरुवाती पासूनच हल्लबोल सुरु केला. २३० रन्सचं आव्हान गाठण्यासाठी इंग्लंडला जशी सुरुवात हवी होती तशी सुरुवात इंग्लंडच्या प्रत्येक फलंदाजाने करण्याचा प्रयत्न केला आणि त्यात ते यशस्वी ही झाले.
रॉय याने २६ बॉलमध्ये ४३ रन्स, रुट याने ४४ बॉलमध्ये ८३ रन्सची झंजावात खेळी केली. या दोघांच्या जबरदस्त खेळाच्या जोरावर इंग्लंडने दणदणीत विजय मिळवला. इंग्लंडने हे आव्हान पूर्ण करण्यासाठी ८ विकेट्स गमावले.