विम्बल्डन : आज विम्बल्डनमध्ये सुपरसंडेचा सुपर मुकाबला रंगणार आहे. सातवेळेचा विम्बल्डन विजेता आणि माजी वर्ल्ड नंबर वन रॉजर फेडरर आणि नोवाक जोकोविचमध्ये आज विम्बल्डनची फायनल रंगणार आहे.
विक्रमी आठवं विजेतेपद पटकावण्याच्या इराद्यानेच फेडरर आज कोर्टवर उतरेल. एकूण 17 ग्रँड स्लॅमला गवसणी घालणा-या फेडररने 2003मध्ये सर्वात प्रथम विम्बल्डनचं विजेतेपद पटकावलं होतं.
2012मध्ये विम्बल्डनचं विजेतेपद पटकावल्यानंतर फेडररला अद्यापपर्यंत एकही ग्रँड स्लॅम पटकावता आलेल नाही. तर जोकोविचने 2011मध्ये विम्बल्डनचं विजेतेपद पटकावलं होतं.
तिस-यांदा विम्बल्डनची फायनल गाठणा-या जोकोविचसमोर दबाव पेलण्याचं आव्हान असणारेय. विशेष म्हणजे फेडररला माजी विजेते स्टीफन एडबर्ग आणि जोकोविचला माजी विजेते बोरिस बेकर यांच मार्गदर्शन लाभतंय.
म्हणजे एक प्रकारे ही लढत एडबर्ग आणि बोरिस बेकर यांच्या दरम्यानही रंगणार आहे.
हे दोघे आत्तापर्यंत 11वेळा ग्रँड स्लॅम स्पर्धेत आमने-सामने आले आहेत. आता हे दोन दिग्गज तब्बल 24 वर्षांनी फेडरर आणि जोकोविचच्या माध्यमातून एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.