गंभीर तिवारीवर भडकला आणि म्हणाला, संध्याकाळी भेट तुला मारेन

आयपीएलच्या दहाव्या हंगामातील केकेआर आणि रायजिंग पुणे सुपरजायंट सामन्यादरम्यान दोन खेळाडू आपापसात भिडले. हे दोघे क्रिकेटपटू म्हणजे केकेआरचा कर्णधार गौतम गंभीर आणि पुण्याचा फलंदाज मनोज तिवारी. 

Updated: Apr 28, 2017, 03:12 PM IST
गंभीर तिवारीवर भडकला आणि म्हणाला, संध्याकाळी भेट तुला मारेन title=

मुंबई : आयपीएलच्या दहाव्या हंगामातील केकेआर आणि रायजिंग पुणे सुपरजायंट सामन्यादरम्यान दोन खेळाडू आपापसात भिडले. हे दोघे क्रिकेटपटू म्हणजे केकेआरचा कर्णधार गौतम गंभीर आणि पुण्याचा फलंदाज मनोज तिवारी. 

मैदानावर नेहमीच वादासाठी प्रसिद्ध गंभीरने मनोजला म्हटले संध्याकाळी भेट तुला मारेन. याला प्रत्युत्तर म्हणून तिवारी म्हणाला, संध्याकाळी का आताच बाहेर चल. 

यावादादरम्यान अंपायरिगं करत असलेले श्रीनाथ दौडकर यांनी हस्तक्षेप केला. केकेआरचा डाव सुरु असताना १५व्या षटकात ही घटना घडली. 

तिवारी सामन्यादरम्यान वारंवार स्लोजिंग करत होता. यामुळे गंभीर नाराज झाला. नाराज झालेल्या गंभीरने मैदानावरच तिवारीला सुनावले. या सामन्यात केकेआरने पुण्यावर ७ विकेट राखून विजय मिळवला.