व्हिडिओ : गीता फोगट - साक्षी मलिकची ही मॅच पाहाच!

भारताच्या दोन नावाजलेल्या कुस्तीपटूंमध्ये सामना पाहायला मिळाला तर... होय, गीता फोगट आणि साक्षी मलिक या दोघींमध्ये झालेला एक सामना सध्या पाहायला मिळतोय. 2015 साली हा सामना रंगला होता... 

Updated: Dec 30, 2016, 04:46 PM IST
व्हिडिओ : गीता फोगट - साक्षी मलिकची ही मॅच पाहाच! title=

मुंबई : भारताच्या दोन नावाजलेल्या कुस्तीपटूंमध्ये सामना पाहायला मिळाला तर... होय, गीता फोगट आणि साक्षी मलिक या दोघींमध्ये झालेला एक सामना सध्या पाहायला मिळतोय. 2015 साली हा सामना रंगला होता... 

गीता फोगटनं 2010 च्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये तर साक्षी मलिकननं 2016 च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये भारताची मान उंचावली होती. साक्षीचा विजय ताजा असतानाच... 'दंगल' या सिनेमामुळे गीताचंही भारतीयांच्या मनात आजही स्थान कायम आहे. 

साक्षी आणि गीता दोघीही हरियाणाच्या... साक्षीनं 58 किलो वजनी गटात ऑलिम्पिकमध्ये महिला कुस्तीत पहिलं वहिलं मेडल भारताला मिळवून दिलं. तसंच साक्षी ही ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेली पहिली भारतीय महिला ठरलीय. त्यानंतर तिनं कॉमनवेल्थ गेम्समध्ये 55 किलो वजनी गटात गोल्ड मेडल पटकावलंय.