सिडनी : ऑस्ट्रेलिया संघातून धडाकेबाज फलंदाज ग्लेन मॅक्सवेलला वगळण्यात आला आहे. श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी टीमची निवड झाली, यात ग्लेन मॅक्सवेलला खो देण्यात आला आहे.
ऑस्ट्रेलियाचा संघ सध्या श्रीलंकेत कसोटी मालिका खेळत आहे, ऑस्ट्रेलियाला पहिल्या कसोटी सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले आहे.
क्रिकेट ऑस्ट्रेलियाने १५ सदस्यीय टीमची घोषणा केली. वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिकेचा समावेश असलेल्या तिरंगी मालिका मागच्या महिन्यात झाली, यात बदल करण्यात आले आहेत.
ऑस्ट्रेलिया संघातून मॅक्सवेल आणि ट्रेव्हिस हेड यांना वगळून ऑलराऊंडर मोझेस हेन्रीकस आणि शॉन मार्शचा समावेश करण्यात आला.
'मॅक्सवेलने गेल्या काही सामन्यांमध्ये खूपच कमी धावा केल्या आहेत. त्यामुळे संघात निवड करण्यासाठी त्या पुरेशा नाहीत. ऑस्ट्रेलियासाठी क्रिकेट खेळायचे असेल तर धावा करणे गरजेचे आहे. ग्लेनला धावा बनविण्यासाठी संधी दिली होती, पण तो धावा करू शकलेला नाही. त्यामुळे त्याला संघातून वगळण्याचा निर्णय घेण्यात आला,'
असं निवड समितीचे अध्यक्ष रॉड मार्श म्हटले आहे.