गुजरात लायन्सवर आमलचा 'हमला', हंगामातील दुसरे शतक

पंजाबच्या हाशिम आमलाने गुजरात लायन्सविरुद्ध जोरदार हमला चढवताना शानदार शतक ठोकलेय. विशेष म्हणजे त्याचे हे हंगामातील दुसरे शतक आहे. त्याने ६० चेंडूत १०४ धावा ठोकल्या.

Updated: May 8, 2017, 12:14 AM IST
गुजरात लायन्सवर आमलचा 'हमला', हंगामातील दुसरे शतक title=

मोहाली : पंजाबच्या हाशिम आमलाने गुजरात लायन्सविरुद्ध जोरदार हमला चढवताना शानदार शतक ठोकलेय. विशेष म्हणजे त्याचे हे हंगामातील दुसरे शतक आहे. त्याने ६० चेंडूत १०४ धावा ठोकल्या.

आयपीएलच्या एकाच हंगामात दोन शतके झळकावणारा हाशिम आमला तिसरा क्रिकेटपटू ठरलाय. या हंगामातील पहिले शतक त्याने मुंबईविरुद्धच्या सामन्यात ठोकले होते. 

याआधी एकाच हंगामात दोन शतके ठोकण्याची किमया दोन खेळाडूंना करता आलीये ती म्हणजे ख्रिस गेल आणि विराट कोहली. कोहलीने आयपीएलच्या नवव्या हंगामात दोन शतके ठोकली होती. तर बंगळुरुच्याच ख्रिस गेलने २०१४मध्ये ही कामगिरी केली होती.