पहिल्या ३६ चेंडूत केकेआरने रचला इतिहास

सुनील नरिने आणि ख्रिस लिनच्या तुफानी अर्धशतकांच्या जोरावर केकेआरने आरसीबीला ६ विकेट राखून हरवले. या विजयासह केकेआर पॉईंटटेबलमध्ये दुसऱ्या स्थानावर पोहोचलीये.

Updated: May 7, 2017, 09:21 PM IST
पहिल्या ३६ चेंडूत केकेआरने रचला इतिहास title=

बंगळूरु : सुनील नरिने आणि ख्रिस लिनच्या तुफानी अर्धशतकांच्या जोरावर केकेआरने आरसीबीला ६ विकेट राखून हरवले. या विजयासह केकेआर पॉईंटटेबलमध्ये दुसऱ्या स्थानावर पोहोचलीये.

आरसीबीने केकेआरसमोर विजयासाठी १५९ धावांचे आव्हान ठेवले होते. हे आव्हान केकेआरने १५.१ षटकांत पूर्ण केले. 

सुनील नरिनेने १७ चेंडूत ५४ धावा तर लिनने २२ चेंडूत ५० धावा तडकावल्या. पॉवरप्लेच्या पहिल्या ६ षटकांतच या दोन्ही फलंदाजांनी मिळून १०५ धावा ठोकल्या. आयपीएलमध्ये पॉवरप्लेमधील षटकांत झालेल्या या सर्वाधिक धावा आहेत. यापूर्वी २०१४मध्ये चेन्नईच्या संघाने पंजाबविरुद्ध खेळताना पॉवरप्लेमध्ये १०० धावा केल्या होत्या.