नवी दिल्ली : फिरोजशाह कोटला मैदानावर पहिली एलिमिनेटर मॅच रंगली. महत्त्वाच्या मॅचमध्ये कोलकात्याने टॉस जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्यामुळे प्रथम बॅटींग करत हैदराबादसमोर मोठा स्कोर उभा करण्याचं आव्हान होतं. हैदराबादने कोलकात्याला 163 रन्सचं टार्गेट दिलं होतं. पण ते पूर्ण करण्यात कोलकाता अपयशी ठरलं आणि २२ रन्सने हैदराबादचा विजय झाला. आता हैदराबादचा सामना हा गुजरात लायन्ससोबत होणार आहे.
कोलकाता या मॅचमध्ये पराभूत झाल्याने त्यांचं आयपीएल 2016 मधलं आव्हान संपुष्टात आलं आहे. बंगळुरु या आधीच फायनलमध्ये पोहोचला आहे त्यामुळे आता हैदराबाद आणि गुजरात यांच्यातील सामन्यात जो संघ जिंकेल त्यांना सामना फायनलमध्ये विराट कोहलीच्या बंगळुरु टीमसोबत होणार आहे.
पाहा लाईव्ह स्कोरकार्ड