बंगळुरू : टीम इंडियाचा कप्तान विराट कोहली याच्या आक्रमकतेस आपण विरोध करणार नसल्याचं नवनियुक्त प्रशिक्षक अनिल कुंबळे यांनी म्हटलंय.
मात्र यासोबत कुंबळे हे देखील बोलायला विसरला नाही की, 'भारताचे राजदूत म्हणून वावरत असलेल्या क्रिकेटपटूंना जबाबदारीचे भानही असावयास हवे.'
अनिल कुबंळे पुढे म्हणाला, 'मलाही कोहलीची आक्रमकता आवडते, मी देखील आक्रमक होतो. मात्र ही आक्रमकता खेळपट्टीवर दाखविण्याची आमची पद्धत बहुतेक निराळी आहे.
अर्थातच आक्रमकतेस विरोध करणे योग्य नाही. परंतु भारताचे राजदूत आणि संघाचा एक भाग म्हणून तुमच्यावर असलेल्या जबाबदारीचे भानही असावयास हवे.यात एक पुसटशी रेषा आहे, त्याची जाणीव ठेवली जाईल, याची मला आशा आहे.
या पार्श्वभूमीवर खेळामध्ये जास्तीत जास्त सातत्य ठेवण्याचा आमचा प्रयत्न असेल, असे कुंबळे यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले. कुंबळे हे प्रशिक्षकपदी असताना टीम इंडिया आता लवकरच वेस्ट इंडिजशी ४ कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे.