मेलबर्न : रविवारी क्रिकेटच्या रणांगणावर महायुद्ध रंगणार आहे. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या दोन व्हीआयपी टीम्समध्ये वर्ल्ड कपची मेगा फायनल रंगणार आहे. सुपर संडेचा सुपर मुकाबला पाहण्यासाठी क्रिकेट फॅन्सही आतूर आहेत. आता कांगारु वर्ल्ड कपवर पाचव्यांदा कब्जा करतात की किवी पहिल्या-वहिल्या वर्ल्ड कपला गवसणी घालतात याकडेच तमाम क्रिकेट फॅन्सचं लक्ष लागून राहिलंय.
तब्बल चार वेळा वर्ल्ड कपला गवसणी घालणारी ऑस्ट्रेलिया आणि प्रथमच वर्ल्ड कपची फायनल गाठणारी न्यूझीलंड यांच्यामध्ये विजेतपदासाठी महामुकाबला रंगणार आहे. दोन्ही होस्ट कंट्रीमध्ये हा मुकाबला खेळला जाईल. या हाय व्होल्टेज मुकाबल्यात ऑस्ट्रेलियाचं पारड कंचित जड आहे. कारण फायनल ऑस्ट्रेलियातील मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर रंगणार आहे.
न्यूझीलंडने आत्तापर्यंत सगळ्या लढती जिंकल्या असल्या तरी त्या आपल्याच भूमीत जिंकलेल्या आहेत. यामुळे मेलबर्नवरील मोठ्या ग्राऊंडवर खेळण्याचं आव्हान किवींसमोर असेल. ऑस्ट्रेलियाला लीग राऊंडमध्ये जरी न्यूझीलंडकडून पराभव स्वीकारावा लागला असला तरी आता कांगारुंच्या घरात मुकाबला आहे. याचबरोबर वर्ल्ड कप जिंकण्याची त्यांना जणूकाही सवयच आहे. तर न्यूझीलंडला प्रेशरमध्ये आणि मेगा इव्हेंटच्या फायनलमध्ये खेळण्याचं आव्हान असेल.
या मुकाबल्याला एक भावनिक किनारही असेल कारण ऑसी कॅप्टन मायकल क्लार्कची ही शेवटची वन-डे असणार आहे. यामुळे वर्ल्ड कप जिंकून क्लार्कला विजयी सेंट ऑफ देण्यासाठी कांगारु आतून असतील. तर किवी पहिला-वहिला वर्ल्ड कप जिंकण्यासाठी जीवीचं रान करतील.
दोन्ही टीम्स या दर्जेदार आहेत. ऑस्ट्रेलियाकडे डेप्थ असलेली बॅटींग लाईन-अप आहे. तर न्यूझीलंडकडे मोठे हिटर्स आहेत. स्टिवन स्मिथ, डेविड वॉर्नर, एराँच फिंच, शेन वॉटसन, ग्लेन मॅक्सनवेलसारखे तगडे बॅट्समन कांगारुंकडे आहे. अगदी तळाला मिचेल जॉन्सनही निर्णायक क्षणी तडाखेबंद बॅटींग करु शकतो. तर न्यूझीलंडकडे खुद्द कॅप्टन ब्रँडन मॅक्कलम हा मोठा हिटर आहे. याचबरोबर मार्टिग गप्टिल, ग्रँड एलियट, कोरि एँडरसन, केन विलियमससारखे हिटर्सही आहेत.
मिचेल स्टार्क, मिचेल जॉन्सन या दोन फास्ट बॉलर्सकडून किवी बॅट्समनला जपून रहाव लागेल. याखेरीच जोश हेझलवूड, जेम्स फॉकनर हे फास्टर आणि ग्लेन मॅक्सवेलसारखा स्पिनरही कांगारुंकडे आहे. तर किवींच्या ताफ्यात ट्रेन्ट बोल्ट हा टूर्नामेंटमधील मोस्ट विकेट टेकर बॉलर आहे. याचबरोबर टीम साऊदी, एँडरसन सारखे फास्टर आणि डॅनिएल व्हिटोरी हा अनुभवी स्पिनर त्यांच्याकडे आहे.
दोन्ही टीम्सवर नजर टाकल्यास मुकाबला तुल्यबळ प्रतिस्पर्ध्यांमधील आहे हे स्पष्टचं होत. आता या मोस्ट अवेटेड मॅचमध्ये कोण बाजी मारत आणि वर्ल्ड चॅम्पियन बनत याचीच उत्सुकता साऱ्यांना लागून राहिलीय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.