टी-२० विश्व चषकाचा भारत प्रबल दावेदार : ब्रायन लारा

भारतीय टीम सध्या अनुकुल परिस्थितीचा सामना करत आहे. मात्र, भारत यातून बाहेर पडेल. पुढील वर्षी होणाऱ्या विश्वचषक टी-२० चॅम्पियनशीपमध्ये भारत प्रबल दावेदारांपैकी एक असेल, असे मत वेस्टइंडिजचे आघाडीचा खेळाडू ब्रायन लारा यांने व्यक्त केले.

Updated: Oct 14, 2015, 06:10 PM IST
टी-२० विश्व चषकाचा भारत प्रबल दावेदार : ब्रायन लारा title=

हैदराबाद : भारतीय टीम सध्या अनुकुल परिस्थितीचा सामना करत आहे. मात्र, भारत यातून बाहेर पडेल. पुढील वर्षी होणाऱ्या विश्वचषक टी-२० चॅम्पियनशीपमध्ये भारत प्रबल दावेदारांपैकी एक असेल, असे मत वेस्टइंडिजचे आघाडीचा खेळाडू ब्रायन लारा यांने व्यक्त केले.

भारत-दक्षिण आफ्रिकेतील टी-२० मालिका २-०ने भारताने गमावली. मात्र, पुढील वर्षी भारतात टी-२० विश्वचषक होईल. लाराने एका कार्यक्रमात हे सांगितले. माझे म्हणणे आहे की, भारतीय टीम आपल्या मायभूमीत सर्वश्रेष्ठ खेळ करु शकेल. महेंद्रसिंग धोनीने २०११ मध्ये वर्ल्डकप जिंकून त्याने ते करुन दाखवलं आहे. त्याच्याकडे अनेक योजना आहेत. तो सातत्याने नवनविन प्रयोग करत असतो, असे  लारा म्हणाला.

मायदेशात खेळताना टीम इंडिया मजूब असते. त्यांना त्यांचा मायभूमीचा फायदा होतो. तो टीम इंडिया निश्चित उठविल, असे लारा म्हणाला. दरम्यान, त्यांने सांगितले, सचिन तेंडुलकर, व्ही व्हीएस लक्ष्मण, राहुल द्रविड, महेंद्र सिंग धोनी, विराट कोहली माझे चांगले मित्र आहेत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.