पुजारा-विजयच्या सेंच्युरीमुळे भारताला सावरलं

इंग्लंडच्या पहिल्या इनिंगमधल्या 537 धावांच्या डोंगराला भारतानंही चोख प्रत्युत्तर दिलं आहे.

Updated: Nov 11, 2016, 06:16 PM IST
पुजारा-विजयच्या सेंच्युरीमुळे भारताला सावरलं title=

राजकोट : इंग्लंडच्या पहिल्या इनिंगमधल्या 537 धावांच्या डोंगराला भारतानंही चोख प्रत्युत्तर दिलं आहे. चेतेश्वर पुजारा आणि मुरली विजय यांच्या शानदार सेंच्युरीमुळे तिसऱ्या दिवसाअखेरीस भारताचा स्कोअर 319/4 एवढा झाला आहे. यामुळे भारत अजूनही 218 रननी पिछाडीवर आहे.  

दिवसाच्या शेवटी विराट कोहली 26 तर नाईट वॉचमन म्हणून आलेला अमित मिश्रा शून्य रनवर खेळत आहे. तिसऱ्या दिवसाची सुरुवात 63/0नं केल्यानंतर सुरुवातीला स्टुअर्ट ब्रॉ़डनं गौतम गंभीरला आऊट केलं. त्यानंतर आलेल्या पुजारानं मुरली विजयबरोबर 209 रनची पार्टनरशीप केली. मुरली विजय 126 तर पुजारा 124 रनवर आऊट झाला.