पहिल्या टी 20 मध्ये भारताचा पराभव

झिम्बाब्वेविरुद्धच्या पहिल्या टी 20 मध्ये भारताचा 2 रननी पराभव झाला आहे.

Updated: Jun 18, 2016, 08:25 PM IST
पहिल्या टी 20 मध्ये भारताचा पराभव title=

हरारे : झिम्बाब्वेविरुद्धच्या पहिल्या टी 20 मध्ये भारताचा 2 रननी पराभव झाला आहे. या मॅचमध्ये टॉस जिंकून धोनीनं पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला, पण झिम्बाब्वेच्या टीमला 20 ओव्हरमध्ये 170 रन बनवता आल्या. 

झिम्बाब्वेकडून एल्टन चिगंबुरानं फक्त 26 बॉलमध्ये 54 रन बनवल्या. चिगंबुराच्या या इनिंगमध्ये तब्बल 7 सिक्सचा समावेश होता. भारताकडून जसप्रित बुमराहनं सर्वाधिक दोन विकेट घेतल्या तर रिशी धवन, अक्सर पटेल आणि युझेवेंद्र चहालला प्रत्येकी एक विकेट मिळाली. 

171 रनचा पाठलाग करायला आलेल्या भारताची सुरुवात खराब झाली. पहिल्याच बॉलला वनडे सीरिजमध्ये शानदार कामगिरी करणारा के.एल.राहुल आऊट झाला. यानंतर मात्र टप्प्या टप्प्यानं भारताच्या विकेट पडतच गेल्या. मनिष पांडेनं या मॅचमध्ये भारताकडून सर्वाधिक 48 रन केल्या. 20 ओव्हरमध्ये भारताला 168 रनच बनवता आल्या.