क्रिकेटप्रेमींना मेजवानी, भारत- पाकमध्ये क्रिकेट युद्ध

भारतीय आणि पाकिस्तान क्रिकेट चाहत्यांसाठी खूशखबर आहे. येणाऱ्या आठ वर्षांत भारत- पाक या दोन्ही देशांमध्ये 6 क्रिकेट मालिका होणार आहे. बीसीसीआय आणि पीसीबीने यासंबंधित खेळासाठी एकत्रित करार केला आहे. 

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Jun 27, 2014, 09:15 PM IST
क्रिकेटप्रेमींना मेजवानी, भारत- पाकमध्ये क्रिकेट युद्ध title=

नवी दिल्ली : भारतीय आणि पाकिस्तान क्रिकेट चाहत्यांसाठी खूशखबर आहे. येणाऱ्या आठ वर्षांत भारत- पाक या दोन्ही देशांमध्ये 6 क्रिकेट मालिका होणार आहे. बीसीसीआय आणि पीसीबीने यासंबंधित खेळासाठी एकत्रित करार केला आहे. 

मात्र भारत सरकारचा ग्रीन सिग्नल मिळाल्यावरच क्रिकेट प्रेमींना खरा आनंद लुटता येणार आहे. 

मेलबर्नमध्ये आयसीसी बैठकीच्यावेळी बीसीसीआय आणि पीसीबीमध्ये हा करार झाला असून भारत 2015ला पाकिस्तानसोबत पहिली सिरीज खेळली जाईल त्यानंतर 2023 पर्यंत दोन्ही देशांमध्ये एकूण सहा सिरीज खेळण्यात येतील. 

पीसीबीच्या माहितीनुसार, सहामधल्या चार सिरीज या संयुक्त अरब किंवा पाकिस्तानमध्ये होतील. जागेसंबंधी शेवटचा निर्णय बीसीसीआयच्या मंजूरीनंतर घेतला जाणार आहे.  

26/11च्या मुंबईवरील आतंकवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानसोबत सर्व क्रिकेटचे संबंध संपुष्टात आले होते. भारतीयांचा आरोप आहे की, 26/11 चा हल्ला हा पाकिस्ताननी घडवून आणला होता. 2012-2013ला पाकिस्तानी टिमने भारताचा दौरा केला होता. त्याचदरम्यान तीन वनडे आणि दोन टी 20 सामने झाले होते. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.