वर्ल्डकप सराव सामन्यात भारताची लढत द.आफ्रिका, वेस्ट इंडिजशी

पुढील महिन्यात सुरु होणाऱ्या आयसीसी टी-२० वर्ल्डकपमध्ये सराव सामन्यात भारताची लढत दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज या दोन संघाशी होणार आहे. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात १० मार्चला सामना होणार आहे. हा सामना कोलकाताच्या ईडन गार्डन्स मैदानावर खेळवला जाईल. 

Updated: Feb 16, 2016, 03:49 PM IST
वर्ल्डकप सराव सामन्यात भारताची लढत द.आफ्रिका, वेस्ट इंडिजशी title=

नवी दिल्ली : पुढील महिन्यात सुरु होणाऱ्या आयसीसी टी-२० वर्ल्डकपमध्ये सराव सामन्यात भारताची लढत दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज या दोन संघाशी होणार आहे. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात १० मार्चला सामना होणार आहे. हा सामना कोलकाताच्या ईडन गार्डन्स मैदानावर खेळवला जाईल. 

त्यानंतर भारताचा पुढील सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध १२ मार्चला वानखेडेच्या मैदानावर होईल. पहिल्या राऊंडमध्ये सहभागी संघाचे सराव सामने तीन ते सहा मार्चदरम्यान धरमशाला आणि मोहालीत होतील. तर दुसऱ्या राऊंडमध्ये सहभागी संघांचे सामने १० ते १५ मार्चरम्यान कोलकाता आणि मुंबईत खेळवण्यात येतील. 

आयसीसीने जाहीर केलेल्या वर्ल्डकप वेळापत्रकानुसार पुरुषांच्या संघाचे सामने दुपारी तीन वाजल्यापासून सुरु होती. तर संध्याकाळचे सामने साडेसातला सुरु होतील. 

महिला संघाचे सराव सामने १० ते १४ मार्चदरम्यान बंगळूरु आणि चेन्नईमध्ये खेळवण्यात येतील. भारतीय महिला संघाचा पहिला सराव सामना आयर्लंडविरुद्ध १० मार्चला होईल.