मुंबई: भारत वि. इंग्लंड तिसऱ्या टेस्टला साऊथहॅम्पटन इथं आजपासून सुरूवात होणार आहे. लॉर्स्द टेस्टवर 28 वर्षांनी ऐतिहासिक विजय मिळवणारी भारतीय टीम सीरिजमधील इंग्लंडविरूद्धची आघाडी 2-0 नं वाढवण्यास उत्सुक असेल. तर दुसरीकडे घरचा आहेर मिळालेली इंग्लिश टीम आपलं नाक वाचवण्यासाठी नव्या प्लानिंगसह मैदानात उतरणार आहे.
नॉटिंगहॅम टेस्ट ड्रॉ झाल्यानंतर, लॉर्डसमध्ये भारतीय टीमनं केलेली कामगिरी ही सर्वांनाच अचंबित करणारी ठरली. 1986 नंतर पहिल्यांदाच टीम इंडियानं कॅप्टन धोनीच्या नेतृत्वाखाली लॉर्ड्सवर ऐतिहासिक टेस्ट विजय साजरा केला. तर या पराभवानं खचलेली इंग्लिश टीम टीकेची धनी ठरली. 2011मध्ये भारताला व्हाईटवॉश देणारी हीच का ती इंग्लिश टीम असे प्रश्न उघडपणे विचारले जाऊ लागले. लॉर्ड्स टेस्टमध्ये इंग्लंडच्या बाजूने केवळ टॉस होता, संपूर्ण मॅचवर हुकूमत गाजवली ती ब्लू ब्रिगेडने.
त्याच कामगिरीची साऊथहॅम्पटन टेस्टमध्ये पुनरावृत्ती करण्यासाठी टीम इंडिया सज्ज असणार आहे. टीम इंडियाच्या बॅटिंगची मदार असणार ती तुफान फॉर्मात असलेला ओपनिंग बॅट्समन मुरली विजयवर, तर चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे या बॅट्समन्सवर मिडल ऑर्डरमध्ये मोठ्य इनिंग्स खेळण्याची जबाबदारी असेल. पहिल्या दोन्ही टेस्टमध्ये निष्प्रभ ठरलेल्या शिखर धवनला आपल्या खेळात सुधारणा करावी लागणार आहे. किंवा धवनला विश्रांती देऊन कमबॅकसाठी सज्ज असलेल्या गौतम गंभीरला कॅप्टन धोनी संधी देणार का याकडे सर्वांचं लक्षं लागलेलं असणार.
स्वत: धोनीसह रवींद्र जाडेजा आणि भुवनेश्वर कुमार अखेरपर्यंत किल्ला लढवताना दिसले आहेत. त्यामुळं इंग्लिश बॅटिंगलाईनअपलाही भारताच्या तोडीस तोड कामगिरी करावी लागणार. कॅप्टन ऍलिस्टर कूक सातत्यानं अपयशी ठरतोय. तर इयान बेलला अनुभवी खेळी करावी लागणार आहे. मॅट प्रायर दुखापतग्रस्त झाल्यानं त्याच्याऐवजी विकेटकीपर म्हणून जोस बटलरची नियुक्ती झाली आहे. गॅरी बॅलेंस आणि जो रूट यांचा फॉर्म हीच काय ती सध्या इंग्लंडची बॅटिंगमधील जमेची बाजू म्हणावी लागेल. टीममध्ये स्पिनर म्हणून आलेला मोईन अली तर केवळ बॅटिंगच चांगली करतोय. त्यामुळं स्टुअर्ट ब्रॉड, जेम्स अँडरसनसह, लियाम प्लंकेट आणि बेन स्टोक्सवर योग्य लाईन लेंग्थवर बॉलिंग करण्याचं आव्हान असेल. जेणेकरून भारतीय बॅटिंगला ब्रेल लावता येईल. तर इंग्लिश बॅट्समन्ससोनर आव्हान असणार आहे ते मॅचविनिंग बॉलिंग टाकणारे ईशांत शर्मा आणि भुवनेश्वर कुमार यांचं. शिवाय मोहम्मद शमी आणि रवींद्र जाडेजाही उपयुक्त स्पेल टाकत विजयात हातभार लावम्यास उत्सुक असतील.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.