टीम इंडिया-दक्षिण आफ्रिकेत इंदौरमध्ये आज रंगणार दुसरी वन-डे

इंदौरमध्ये आज रंगणार दुसरी वन-डे होत आहे. टीम इंडियासमोर कमबॅकचं आव्हान आहेच. तर विजयी लय कायम राखण्यासाठी आफ्रिका सज्ज आहे. त्यामुळे या वन-डेकडे लक्ष लागले आहे.

PTI | Updated: Oct 14, 2015, 08:40 AM IST
टीम इंडिया-दक्षिण आफ्रिकेत इंदौरमध्ये आज रंगणार दुसरी वन-डे  title=

भोपाळ : इंदौरमध्ये आज रंगणार दुसरी वन-डे होत आहे. टीम इंडियासमोर कमबॅकचं आव्हान आहेच. तर विजयी लय कायम राखण्यासाठी आफ्रिका सज्ज आहे. त्यामुळे या वन-डेकडे लक्ष लागले आहे.

टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी या मालिकेत फारशी चमक दाखवू शकलेला नाही. त्यामुळे त्याच्यावर टीकेचा भडिमार होत आहे.  पहिल्या एकदिवसीय सामन्यात अपेक्षित विजय मिळवून न देऊ शकल्यामुळे धोनी दुसऱ्या सामन्यात काय रणनीती आखतो, यावरच  बरच काही आहे. 

टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अद्याप विजयाची चव चाखलेली नाही. ट्वेन्टी-२० मालिकेत भारताला सपाटून मार खावा लागला. आयपीएलच्या अंतिम फेरीत धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्जला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. त्यानंतर बांगलादेशविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतसुद्धा भारत पराभूत झाला होता. नेतृत्वाची एकीकडे कसोटी चालू असताना धोनीच्या फलंदाजीच्या फॉर्मलाही ग्रहण लागले आहे. त्यामुळे धोनी टीकेचा धनी बनलाय.

कॅप्टन कुल ओळखला जाणाऱ्या धोनीने आपले मोठे फटके खेळण्याचे फलंदाजीचे कौशल्य हरवल्याचे जाणवले. ३० चेंडूंत ३१ धावांच्या खेळीत धोनीने एकमेव चौकार ठोकला.  त्यामुळे त्याच्या खेळातील सातत्य हरवल्याची टीका होत आहे. दुसऱ्या वन-डेत भारतीय फलंदाजीची मदार प्रामुख्याने सलामीवीर रोहित शर्मावर असेल. धरमशालातील पहिल्या ट्वेन्टी-२० सामन्यातील शतकानंतर कानपूरला रोहितने दीडशे धावांची शानदार खेळी साकारली होती. मात्र त्याचा सलामीवीर जोडीदार शिखर धवन मात्र धावांसाठी झगडत आहे. अजिंक्य रहाणेने संघात परतल्यावर ६० धावांची खेळी उभारून आपले महत्त्व पटवून दिले आहे. त्यामुळे प्रामुख्याने फलंदाजीवर भर असेल असेच दिसून येत आहे. बॉलरने चांगली कामगिरी केली तर दुसऱ्या सामन्यात टीम इंडिया विजय नोंदविण्याची शक्यता आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.