इंदुर: दक्षिण आफ्रिकेच्या भारत दौऱ्यात भले ही त्यांची टीम अजून विजयी राहिली असली तरी टीम इंडियाचा धडाकेबाज बॅट्समन रोहित शर्मा फॉर्मात आहे. त्यामुळंच बुधवारी होणाऱ्या दुसऱ्या वनडे मॅचसाठी दक्षिण आफ्रिकेनं रोहित शर्माला आऊट करण्यासाठी '१० बॉल प्लान' केलाय.
आणखी वाचा - विराट कोहलीला मोजावी लागली लज्जास्पद पराभवाची किंमत
रोहितची आक्रमक क्षमता पाहून दक्षिण आफ्रिकन टीमचे बॉलिंगचे कोच चार्ल लेंगवेल्ट यांनी रोहितला लवकर आऊट करण्याची योजना बनवलीय. लेंगवेल्ट यांनी होळकर स्टेडियमवर होणाऱ्या दुसऱ्या वनडे पूर्वी सांगितलं, 'सध्या रोहित खूप चांगली बॅटिंग करतोय. तो भारतीय मैदानात चांगला खेळतो. तो एक शानदार खेळाडू आहे. त्याला टाकण्यात येणारे पहिले १० बॉल महत्त्वाचे आहेत. रोहितला पहिल्या १० बॉलमध्ये आउट करण्याचा प्रयत्न करण्याची गरज आहे. तो अशा खेळाडूंपैकी एक आहे जो २० रन्स बनवल्यानंतर दमदार प्रदर्शन करतो.'
इंदूर वनडे बद्दल लेंगवेल्ट म्हणाले की, जी टीम चांगला तालमेल दाखवेल, मॅचवर त्याच टीमचा दबदबा असेल. हे मैदान हाय स्कोअर वालं मैदान आहे. म्हणून बॉलर्ससाठी कठीण काम होईल.
आणखी वाचा - टी-२० सीरिज पाठोपाठ टीम इंडियानं पहिली वनडेही गमावली
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.