कोलोंबो : भारत आणि श्रीलंकेविरोधात दुसरी कसोटी आजपासून सुरु होणार आहे. मुरली विजय टेस्टसाठी सज्ज झालाय.
गॉलमध्ये झालेल्या लाजीरवाण्या पराभवाची परत फेड करण्याची भारतापुढे सुवर्ण संधी आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसरी टेस्ट कोलंबोमध्ये रंगणार आहे. कुमार संगकाराची ही फेअरवेल टेस्ट असेल त्यामुळे लंकन टीम त्याला विजयी निरोप देण्याच्या उद्देशनचं मैदानात उतरेल.
तर टीम इंडिया तीन टेस्ट मॅचेसच्या सीरिजमध्ये ०-१ने पिछाडीवर असल्यानं दुसरी टेस्ट जिंकण्यासाठी कोहलीची टीम प्रयत्नशील असेल. शिखर धवन दुखापतग्रस्त झाल्यानं टीम इंडियाला मोठा फटका बसलाय. मात्र, मुरली विजय फिट झाल्यानं भारतीय टीमच्या गोटात आनंदाच वातावरण असेल.
कॅप्टन विराट कोहली आता कोणत्या कॉम्बिनेशनसह मैदानात उतरतो याकडे चाहत्यांच लक्ष असेल. कोलंबोच्या मैदानावर पहिल्यांदा बॅटिंग फायदेशीर ठरते. तसंच पिच हे रिझल्ट ओरिएंटेड आहे. या मैदानावर केवळ १८ पैकी चारच मॅच ड्रॉ झाल्यात. त्याचप्रमाणे कुमार संगराकारचं हे मोस्ट फेव्हरिट ग्राऊंड आहे. त्यामुळे लंकन टायगर्सना रोखण्यासाठी कोहली अँड कंपनीला कमालीचे कष्ट करावे लागणार आहेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.