वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया vs युएई सामना

वर्ल्ड कपमध्ये दोन कठीण पेपर सोडवल्यानंतर टीम इंडियाला आता युएई हा अतिशय सोपा पेपर सोडवावा लागणार आहे. महेंद्रसिंग धोनीची टीम इंडिया या मॅचमध्ये हॉट फेव्हिरट असेल. त्यामुळे दुबळ्या युएईविरुद्ध काही बदलही टीम इंडियामध्ये अपेक्षित आहेत. 

Updated: Feb 28, 2015, 09:09 AM IST
वर्ल्ड कपमध्ये  टीम इंडिया vs युएई सामना title=

सिडनी : वर्ल्ड कपमध्ये दोन कठीण पेपर सोडवल्यानंतर टीम इंडियाला आता युएई हा अतिशय सोपा पेपर सोडवावा लागणार आहे. महेंद्रसिंग धोनीची टीम इंडिया या मॅचमध्ये हॉट फेव्हिरट असेल. त्यामुळे दुबळ्या युएईविरुद्ध काही बदलही टीम इंडियामध्ये अपेक्षित आहेत. 

धोनी टीम युएईला परास्त करुन वर्ल्ड कपमध्ये विजयी हॅट्ट्रिक लगावण्याच्या उद्देशानच मैदानात उतरेल. या मॅचची रंगत वाढवणार आहे वसईतला एक मराठमोळा प्लेअर. वसईतल्या दरपाळे या छोट्याशा गावात रहाणारा स्वप्नील पाटील या मॅचमध्ये भारताविरुद्ध खेळणार आहे.. युएइच्या टीममध्ये स्वप्नील विकेटकीपर म्हणून मैदानात उतरणार आहे. त्यामुळे वसईकरांसाठी ही मॅच काहीशी खास असणार आहे.

धोनी ब्रिगेटनं पाकिस्तान आणि बलाढ्य दक्षिण आफ्रिकेला धूळ चारत वर्ल्डकपमध्ये आपला दबदबा कायम ठेवला आहे. नवख्या युएईविरुद्ध आजचा सामना होत आहे. त्यामुळे विजयाची हॅट्ट्रीक धोनीला करता येणार आहे. त्यामुळे या सामन्याकडे लक्ष आहे. हा सामना १२ वाजता सुरु होणार आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.