राहुल, अजिंक्यच्या शतकाच्या जोरावर भारत मजबूत स्थितीत

सबिना पार्क मैदानावर सुरू असलेल्या वेस्टइंडिजविरूद्धच्या दुस-या कसोटी सामन्यात लोकेश राहुलपाठोपाठ तिस-या दिवशी अजिंक्य रहाणे याने  देखील दमदार शतक झळकवलं. रहाणेच्या शतकाच्या जोरावर भारताने तीनशेहून अधिक धावांची आघाडी घेतली आहे.

Updated: Aug 2, 2016, 09:30 AM IST
राहुल, अजिंक्यच्या शतकाच्या जोरावर भारत मजबूत स्थितीत title=

किंगस्टन : सबिना पार्क मैदानावर सुरू असलेल्या वेस्टइंडिजविरूद्धच्या दुस-या कसोटी सामन्यात लोकेश राहुलपाठोपाठ तिस-या दिवशी अजिंक्य रहाणे याने  देखील दमदार शतक झळकवलं. रहाणेच्या शतकाच्या जोरावर भारताने तीनशेहून अधिक धावांची आघाडी घेतली आहे.

कर्णधार विराट कोहलीने संघाच्या ९ बाद ५०० धावा असताना डाव घोषित करुन वेस्ट इंडिजला फलंदाजीचं आमंत्रण दिलं. पण त्यानंतर पाऊस सुरु झाल्यामुळे खेळ होऊ शकला नाही. पावसामुळे ४० षटकांचा खेळ होऊ शकला नाही. मंगळवारी अर्धा तास आधी सामना सुरु होऊ शकतो. दिवसभरात ९८ षटकांचे लक्ष्य आहे. 

या कसोटी सामन्याचे २ दिवस अजून शिल्लक आहेत. चौथ्या दिवशीही हवामान खात्याने पावसाचा अंदाज वर्तवला आहे. वुद्धीमान सहाने ४७ धावा करुन रहाणेला चांगली साथ दिली. दोघांनी सहाव्या विकेटसाठी ९८ धावांची भागीदारी केली. वेस्ट इंडिजकडून रॉसटॉन चेसने प्रभावी गोलंदाजी करत १२१ धावांच्या मोबदल्यात ५ विकेट्स घेतल्या.