अनुष्का भेटीमुळं विराटला बीसीसीआयनं पाठवली नोटीस

भारतीय क्रिकेट टीमचा स्टार खेळाडू आणि रॉयल चॅलेन्जर्स बेंगलुरूचा कर्णधार पुन्हा एकदा वादात सापडला आहे. रविवारी दिल्ली विरूद्धच्या सामन्यादरम्यान अनुष्कासोबतची भेट विराटला महागात पडली आहे, कारण बीसीसीआयनं याबाबत विराटला नोटीस पाठवली आहे. 

Updated: May 19, 2015, 08:00 PM IST
अनुष्का भेटीमुळं विराटला बीसीसीआयनं पाठवली नोटीस   title=

नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट टीमचा स्टार खेळाडू आणि रॉयल चॅलेन्जर्स बेंगलुरूचा कर्णधार पुन्हा एकदा वादात सापडला आहे. रविवारी दिल्ली विरूद्धच्या सामन्यादरम्यान अनुष्कासोबतची भेट विराटला महागात पडली आहे, कारण बीसीसीआयनं याबाबत विराटला नोटीस पाठवली आहे. 

तसंच माहिती अशीही आहे की, 'अॅन्टी करप्शन सिक्युरिटी प्रोटोकॉल'चं उल्लंघन केल्याप्रकरणी बीसीसीआयनं विराटकडून स्पष्टीकरण मागितलं आहे. 

रविवारी दिल्लीविरुद्धचा सामना पावसामुळं थांबला होता, यादरम्यान विराट अनुष्का शर्माला भेटण्साठी व्हीआयपी बॉक्सजवळील कॉरिडोअरमध्ये गेला होता. सामन्या दरम्यान खेळाडूंना कोणालाही भेटण्याची परवानगी नसते, तसंच तोपर्यंत सामना संपलाही नव्हता. त्यामुळं विराटनं घेतलेली अनुष्काची भेट अॅन्टी करप्शन सिक्युरिटी प्रोटोकॉलचं उल्लंघन आहे. 

यावेळी मैदानात उपस्थित असलेले आयपीएलचे चेअरमन यांनी मीडियाला आश्वासन दिलं होतं की, विराटनं कोणत्या प्रोटोकॉलचं उल्लंघन केलं असल्यास, असं पुन्हा न करण्याची नोटीस विराटला दिली जाईल. त्यामुळं आता बीसीसीआयनं विराटला नोटीस पाठवली आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.