कोलकाता : आयपीएल २०१५ च्या फायनल सामन्यात मुंबई इंडियन्सने चेन्नई सुपर किंग्सने २०३ धावांचं आव्हान ठेवलं आहे. कोलकाताच्या ईडन गार्डनमध्ये खेळल्या जाणाऱ्या या सामन्यात चेन्नईने टॉस जिंकून मुंबईला पहिल्यांदा बॅटिंग करण्यासाठी आमंत्रण दिलं होतं.
मुंबईच्या सुरूवात तशी फार चांगली झाली नाही, पार्थिव पटेल शून्यावर परतला, यानंतर कॅप्टन रोहित शर्माने ५० आणि लेंडल सिमन्सने ६८ धावा केल्या, आणि चेन्नईच्या गोलंदाजीचा समाचार घेतला.
रोहित आणि सिमन्सने धोनीची कोणतीही खेळी यशस्वी होऊ दिली नाही, चौकार आणि षटकार लगावत दुसऱ्या विकेटसाठी ११९ रन्सची भागेदारी केली.
रोहितने २६ चेंडूत सहा चौकार आणि २ षटकार लगावत ५० रन्स केले. रोहित ब्रावोंच्या बॉलिंगवर कॅच आऊट झाला.
सिमन्सही रोहितनंतर पव्हेलियनमध्ये परतला, त्याला ड्वेन स्मिने बोल्ड केलं, सिमन्सने ४५ चेंडूत ८ चौकार आणि ३ षटकार लावत, आक्रमक ६८ धावा केल्या.
पोलार्ड और रायुडूनेही धमाका केला, त्यांनी धावांचा वेग सारखाच ठेवला, तो कमी होऊ दिला नाही. त्यांनी ७१ धावांची भागीदारी केली. आणि १८ चेंडूत २ चौकार आणि ३ षटकार लगावले. रायडूने २४ चेंडूत, ३ षटकार लगावत ३६ रन्स केले आणि नाबाद राहिला.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.