निवडा BCCI की CSK सुप्रीम कोर्टाचे श्रीनिवासन यांच्यासमोर पर्याय

आयपीएल स्पॉट फिक्सिंगप्रकरणी सुप्रीम कोर्टानं एन. श्रीनिवासन यांना पुन्हा एकदा दणका देत चेन्नई सुपर किंग्जची मालकी किंवा बीसीसीआयचं अध्यक्षपद यापैकी एक पर्याय निवडण्यास सांगितलं आहे. तसंच गुरुनाथ मयप्पन यांच्यावरही तातडीनं कारवाई करावी असे निर्देशही कोर्टानं बीसीसीआयला दिले आहेत. 

Updated: Dec 9, 2014, 06:50 PM IST
निवडा BCCI की CSK सुप्रीम कोर्टाचे श्रीनिवासन यांच्यासमोर पर्याय title=

नवी दिल्ली: आयपीएल स्पॉट फिक्सिंगप्रकरणी सुप्रीम कोर्टानं एन. श्रीनिवासन यांना पुन्हा एकदा दणका देत चेन्नई सुपर किंग्जची मालकी किंवा बीसीसीआयचं अध्यक्षपद यापैकी एक पर्याय निवडण्यास सांगितलं आहे. तसंच गुरुनाथ मयप्पन यांच्यावरही तातडीनं कारवाई करावी असे निर्देशही कोर्टानं बीसीसीआयला दिले आहेत. 

आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणी नेमलेल्या मुदगल समितीच्या अहवालावर मंगळवारी सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. सुप्रीम कोर्टानं मंगळवारी पुन्हा एकदा बीसीसीआयला चांगलंच फटकारलं. एन. श्रीनिवासन यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असतानाही त्यांनी तामिळनाडू क्रिकेट असोसिएशनच्या बैठकीला हजेरी लावण्यावर सुप्रीम कोर्टानं तीव्र नाराजी व्यक्त केली. 

अखेरीस श्रीनिवासन यांनी त्यांची चूक मान्य करत कोर्टाची माफी मागितली. यानंतर श्रीनिवासन यांनी कोर्टासमोर पाच पर्यायही दिले. यावर सुप्रीम कोर्टानंच श्रीनिवासन यांच्यासमोर गुगली टाकली अन् बीसीसीआयचं अध्यक्षपद किंवा चेन्नई सुपर किंग्जची मालकी यापैकी एक निवडा असे पर्याय त्यांच्यासमोर मांडले. याप्रकरणाची पुढीव सुनावणी उद्या सकाळी साडे दहा वाजता होणार आहे.
 
श्रीनिवासन यांनी मांडलेले पाच पर्याय 

१ . बीसीसीआयची अंतर्गत शिस्तपालन समिती याप्रकरणात लक्ष घालेल. 
२. बीसीसीआय याप्रकरणी समिती नेमेल. 
३. कोर्टानंच याप्रकरणी शिस्तपालन समिती नेमावी. 
४. कोर्टानंच दोन न्यायाधीशांची समिती नेमावी. 
५ . मुदगल समितीच याप्रकरणी कारवाई किंवा शिक्षा देईल.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.