श्रीलंकेच्या ज्युनियर संघाला चेन्नईतून परत पाठवलं

श्रीलंकेच्या 15 वर्षाखालील क्रिकेट संघाला चेन्नईतून माघारी पाठवण्यात आलं आहे. हा संघ क्रिकेट स्पर्धेसाठी श्रीलंकेचा संघ भारतात आला होता. 

Updated: Aug 4, 2014, 08:38 PM IST
श्रीलंकेच्या ज्युनियर संघाला चेन्नईतून परत पाठवलं title=

नवी दिल्ली : श्रीलंकेच्या 15 वर्षाखालील क्रिकेट संघाला चेन्नईतून माघारी पाठवण्यात आलं आहे. हा संघ क्रिकेट स्पर्धेसाठी श्रीलंकेचा संघ भारतात आला होता. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता, यांचा श्रीलंकेच्या संरक्षण खात्याच्या वेबसाइटवरील वादग्रस्त फोटो होता. या फोटोमुळे वादाला सुरूवात झाली.
 
हा वाद पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांच्या फोटोवरुन झाला. हा फोटो आणि त्यासोबत एक प्रेमपत्र असं चित्र रेखाटलं गेल्यानं हा वाद सुरु झाला आहे. श्रीलंकेच्या संरक्षण मंत्रालयाच्या वेबसाईटवर हा वादग्रस्त फोटो होता.

अखेर आयोजकांनी दिलेल्या माहितीनुसार “वाद टाळण्यासाठीच पोलिसांच्या आदेशावरून, श्रीलंकन संघाला रात्री एकच्या विमानाने माघारी धाडलं”.
 
या मताशी सरकार सहमत नसल्याचं सांगून, श्रीलंकेच्या संरक्षण मंत्रालयानं वादानंतर हा फोटो आणि लेख वेबसाईवटरुन हटवला आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.