वर्ल्ड कपपर्यंत फिट होईल - मलिंगा

 श्रीलंकेचा जलद गती गोलंदाज लसिथ मलिंगा न्यूझीलंडविरूद्ध शनिवारी होणाऱ्या सामन्यापूर्वी फिट होणार आहे. स्वतः मलिंगाने पत्रकारांना सांगितले. 

Updated: Feb 9, 2015, 07:43 PM IST
वर्ल्ड कपपर्यंत फिट होईल - मलिंगा title=

वेलिंग्टन :  श्रीलंकेचा जलद गती गोलंदाज लसिथ मलिंगा न्यूझीलंडविरूद्ध शनिवारी होणाऱ्या सामन्यापूर्वी फिट होणार आहे. स्वतः मलिंगाने पत्रकारांना सांगितले. 

घोट्याच्या दुखापतीमुळे मलिंगा न्यूझीलंडविरूध सुरू असलेल्या सात सामन्यांच्या मालिकेत खेळू शकला नाही. रविवारी पत्रकारांना सांगितले की, तो पुनरागमनासाठी तयार आहे. 

श्रीलंकेचा कर्णधार एंजलो मॅथ्यूज याने सांगितले की, मलिंगाने फिटनेस टेस्ट पास केली आणि तो शंभर टक्के फीट झाला आहे. 

मलिंगाने सांगितले की, मी दुखणं सहन करण्याची सवय करीत आहे. मला वर्ल्ड कपमध्ये खेळायचे आहे. दुखणं जाणवलं तरी ते दुय्यम आहे. मला खेळायचे आहे. गतीबद्दल मी निश्चित नाही पण लय आणि रन अप चांगला आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.