मेरी कोमने पटकावलं सुवर्णपदक

भारताची स्टार बॉक्सर मेरी कोमने सुवर्णपदक पटकावलं आहे. एशियाडमध्ये मेरीला पहिल्यांदाच गोल्ड मेडल मिळालं आहे. मेरी कोम दोन मुलांची आई आहे.

Updated: Oct 1, 2014, 12:09 PM IST
मेरी कोमने पटकावलं सुवर्णपदक title=

इंचिओन : भारताची स्टार बॉक्सर मेरी कोमने सुवर्णपदक पटकावलं आहे. एशियाडमध्ये मेरीला पहिल्यांदाच गोल्ड मेडल मिळालं आहे. मेरी कोम दोन मुलांची आई आहे.

कझाकस्तानच्या झैना शेकेरबेकोव्हाला हिला मेरी कोमने अंतिम फेरीत हरवलं.

पहिल्या फेरीत मागे पडलेल्या मेरीनं पुढच्या तिन्ही फेऱ्यांमध्ये मारली बाजी आणि भारताच्या खात्यात सातवं सुवर्णपदक जमा झालं.

सर्वोत्तम प्रदर्शन
48-51 किलोग्राम वजनात मेरी कोमने गोल्ड मिळवलंय. मेरी कोमच्या कोचने म्हटलंय, पदकाची अपेक्षा होती आणि मेरी कोमने आपल्या क्षमतेनुसार सर्वोत्तम प्रदर्शन केलंय.

माझ्यावर दबाव बनवणं अशक्य
सर्वांना माहित आहे, लोक मला चांगलं ओळखतात, किती वर्षापासून खेळतेय, किती वेळेस चॅम्पियन ठरलीय, माझ्यावर दबाव बनवणं शक्य नाही, असं मेरी कोमने म्हटलंय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.