कोहलीशी पंगा घेऊ नका, सीरिजआधीच घाबरले कांगारू

भारताचा कॅप्टन विराट कोहलीशी स्लेजिंग करू नका, कारण ते तुमच्यावरच उलटू शकतं असा सल्ला ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू माईक हसीनं दिला आहे.

Updated: Feb 3, 2017, 08:16 PM IST
कोहलीशी पंगा घेऊ नका, सीरिजआधीच घाबरले कांगारू title=

मुंबई : भारताचा कॅप्टन विराट कोहलीशी स्लेजिंग करू नका, कारण ते तुमच्यावरच उलटू शकतं असा सल्ला ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू माईक हसीनं दिला आहे. ऑस्ट्रेलियाची टीम लवकरच भारत दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्यामध्ये कांगारू भारताविरुद्ध चार टेस्ट मॅचची सीरिज खेळणार आहे.

विराट कोहली हा लढवय्या आहे. त्याला स्लेज केलं तर तो आणखी आक्रमक होतो आणि मोठी खेळी करतो, यामुळे कांगारूंचंच नुकसान होईल, असं हसी म्हणाला आहे.