'बोर्ड म्हणेल तर कॅप्टनशीप सोडून देईल'- धोनी

बांगलादेशविरुद्धची वनडे सीरिज २-०नं गमावल्यानंतर भारतीय टीमचा कॅप्टन महेंद्र सिंह धोनीनं मोठं वक्तव्य केलं. धोनीनं सांगितलं, सीरिज गमावल्यानंतर बीसीसीआयला हवं असेल तर कॅप्टनशीपवरून काढू शकतं.

Updated: Jun 22, 2015, 07:25 AM IST
'बोर्ड म्हणेल तर कॅप्टनशीप सोडून देईल'- धोनी title=

मिरपूर: बांगलादेशविरुद्धची वनडे सीरिज २-०नं गमावल्यानंतर भारतीय टीमचा कॅप्टन महेंद्र सिंह धोनीनं मोठं वक्तव्य केलं. धोनीनं सांगितलं, सीरिज गमावल्यानंतर बीसीसीआयला हवं असेल तर कॅप्टनशीपवरून काढू शकतं.

मिरपूरमध्ये दुसरी वनडे गमावल्यानंतर धोनी पत्रकारांसोबत बोलतांना म्हणाला, 'माझ्याशिवाय टीम जर चांगली खेळते तर बोर्ड मला कॅप्टनशीपवरून काढू शकतं. मी टीममध्ये कॅप्तानीशिवाय खेळू शकतो.' पराभवाच्या दबावानंतर धोनी असं वक्तव्य केलंय.

अजिंक्य रहाणेच्या जागी अंबाती रायडूला टीममध्ये घेतल्याबद्दल धोनी म्हणाला, 'प्लेइंग इलेव्हनची निवड माझ्या अधिकार क्षेत्रात आहे. मी याची जबाबदारी घेतो. तिसऱ्या ओपनर सारखा तो (रहाणे) चांगलं काम करेल. त्यानं फास्ट विकेटवर चांगली बॅटिंग केलीय. रहाणेला थोडी वाट पाहावी लागेल.'

तर बॅटिंग ऑर्डर बदलल्याबद्दल धोनी म्हणाला, 'मला वाटलं होतं की, मी बॅटिंग करायला वरच्या क्रमात जावं आणि खुलेपणानं बॅटिंग करील.'

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.