मुलगी 'झिवा'सोबत पहिल्यांदा एकत्र दिसले धोनी आणि साक्षी!

टीम इंडियाचा कॅप्टन कूल महेंद्र सिंह धोनी आणि त्याची पत्नी साक्षी आपल्या मुलीसोबत पहिल्यांदा एकत्र दिसले. धोनीच्या ऑफिशिअल फेसबुक पेजवर दोन फोटो शेअर केलेत. ज्यात धोनी आपली मुलगी झिवाला कुशीत घेतलेला दिसतोय.

Updated: Apr 5, 2015, 09:50 AM IST
मुलगी 'झिवा'सोबत पहिल्यांदा एकत्र दिसले धोनी आणि साक्षी! title=

दिल्ली: टीम इंडियाचा कॅप्टन कूल महेंद्र सिंह धोनी आणि त्याची पत्नी साक्षी आपल्या मुलीसोबत पहिल्यांदा एकत्र दिसले. धोनीच्या ऑफिशिअल फेसबुक पेजवर दोन फोटो शेअर केलेत. ज्यात धोनी आपली मुलगी झिवाला कुशीत घेतलेला दिसतोय.

 

धोनी आणि साक्षी शुक्रवारी सुरेश रैनाच्या लग्नात सहभागी झाले होते. या लग्नासाठी दोघं दिल्लीत आलेत. धोनीनं फक्त फोटो शेअर केले, त्यात काही लिहीलं नाही. मात्र फोटोवरून असं वाटतं की, दोन्ही फोटो एअरपोर्टवर घेतलले असावेत.

६ फेब्रुवारीला साक्षीनं मुलीला जन्म दिला होता. त्यावेळी धोनी वर्ल्डकपसाठी ऑस्ट्रेलियामध्ये होता. यापूर्वी साक्षीनं झिवाचा एक फोटो ट्वीट केला होता. ज्यात मुलीचा फक्त हात दिसत होता. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.