कॅप्टन कूल धोनीची फलंदाजांना तंबी

टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने, ट्‌वेंटी-२० विश्वचषक स्पर्धेतील आव्हान कायम राखायचे असेल, तर बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात वेगाने आणि भरपूर धावा करणे आवश्‍यक आहे, असा सल्ला दिला आहे.  टीम इंडियातील 'बिग हिटर्स'ने बांगलादेशविरुद्ध जोरदार फटकेबाजी करावी, असं धोनीने सुचवलं आहे.

Updated: Mar 22, 2016, 09:14 PM IST
कॅप्टन कूल धोनीची फलंदाजांना तंबी title=

बंगळूर : टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने, ट्‌वेंटी-२० विश्वचषक स्पर्धेतील आव्हान कायम राखायचे असेल, तर बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात वेगाने आणि भरपूर धावा करणे आवश्‍यक आहे, असा सल्ला दिला आहे.  टीम इंडियातील 'बिग हिटर्स'ने बांगलादेशविरुद्ध जोरदार फटकेबाजी करावी, असं धोनीने सुचवलं आहे.

या स्पर्धेतील पहिल्या सामन्यात भारताला न्यूझीलंडकडून पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे भारताच्या निव्वळ धावगतीवर त्याचा विपरित परिणाम झाला. दुसऱ्या सामन्यात भारताने पाकिस्तानवर मात करत महत्त्वाचे दोन गुण मिळविले.  ट्‌वेंटी-२० विश्वचषक स्पर्धेत भारताचा सामना बुधवारी बांगलादेशशी होत आहे. 

पुढील दोनपैकी किमान एका सामन्यात दणदणीत विजय मिळविणेही गरजेचे आहे. धोनीने बांगलादेशी गोलंदाजांना लक्ष्य करण्याची भूमिका स्पष्ट केली आहे, कारण, पहिल्या सामन्यातील पराभव आणि उणे झालेली निव्वळ धावगती, यामुळे भारताला पुढील दोन्ही सामने जिंकणे आवश्‍यक आहे.