कॅप्टन कूलची कन्या 'जीवा'चा पहिला फोटो

महेंद्र सिंह धोनी सध्या आयसीसी क्रिकेट वर्ल्डकप जिंकण्यासाठी टीम इंडियासोबत मेहनत घेतोय. टीम इंडियाचा विजय रथाची घौडदौड सुरूच असतांना, धोनीची पत्नी साक्षीवर मुलगी जीवाच्या देखभालीची जबाबदारी आहे.

Updated: Mar 4, 2015, 03:28 PM IST
कॅप्टन कूलची कन्या 'जीवा'चा पहिला फोटो title=

नवी दिल्ली : महेंद्र सिंह धोनी सध्या आयसीसी क्रिकेट वर्ल्डकप जिंकण्यासाठी टीम इंडियासोबत मेहनत घेतोय. टीम इंडियाचा विजय रथाची घौडदौड सुरूच असतांना, धोनीची पत्नी साक्षीवर मुलगी जीवाच्या देखभालीची जबाबदारी आहे.

साक्षीने सोमवारी तिच्या चिमुकलीचा पहिला फोटो ट्वीटरवर प्रकाशित केला आहे. यात जीवाचा हात धरला आहे. या फोटोत जीवाचा उजवा हात दिसतोय, हा धोनीच्या परिवाराकडून जारी करण्यात आलेला पहिला फोटो असेल.

Bundle of Joy !! pic.twitter.com/l4NDhdXFR4

— Sakshi Singh Dhoni (@SaakshiSRawat) March 2, 2015

धोनीची पत्नी साक्षीने ६ फेब्रुवारी रोजी कन्यारत्नाला जन्म दिला. आपल्या घरी आलेल्या या परीचं धोनी आणि साक्षीने जीवा नाव ठेवलं. जीवा एक पारशी शब्द आहे, ज्यांचा अर्थ होतो, सुंदर, तेजस्वी, कुशाग्र. ही माहिती देखिल धोनीने काही दिवसांआधी ट्वीट केली होती.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.