मुंबई : आयपीएल सामन्यांना आजपासून सुरुवात होतेय. आज पहिला सामना पुणे आणि मुंबईय यांच्यात खेळला जाणार आहे. पुण्याचा कर्णधार धोनीचा सामना मागच्या सीजनची विजेता रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्सच्या टीम बरोबर होणार आहे.
पुण्याला मुंबईला त्यांच्याच होम ग्राऊंडवर हरवण्याचं मोठं आव्हान असणार आहे. मागच्या वर्षी मुंबई इंडियन्सने खूपच खराब सुरुवात केली होती पण सिमन्सने टीमला वर आणलं. याच सिमन्सने वर्ल्डकप सेमीफायनलमध्ये भारताच्या पराभवात महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यामुळे मुंबईकडे एक चांगला बॅट्समन आहे. अंबाती रायडू, इंग्लंडचा विकेटकीपर जोस बटलर, कोरी अँडरसन, केरोन पोलार्ड आणि हार्दिक पांड्या यांच्या सारखे चांगले खेळाडू आहेत.
मलिंगा हा सध्या दुखापतीमुळे खेळू शकणार नाही तरी मुंबईकडे जसप्रीत बुमराह, अँडरसन, टिम साउदी, मिचेल मॅक्लनघन, हरभजन सिंग आणि मर्चेंट डी लांगे हे चांगले बॉलर्स आहे.
पुणे संघाकडे ही अजिंक्य रहाणे, केविन पीटरसन, स्टीव स्मिथ, मिचेल मार्श, फाफ डू प्लेसिस आणि कॅप्टन धोनी यासारखे चांगले खेळाडू आहेत तर एल्बी मॉर्केल आणि इरफान पठान सारखे दोन ऑलराउंडर ही आहे. इशांत शर्मा आणि रविचंद्रन अश्विनमुळे संघ मजबूत स्थितीत आहे.