MUST WATCH : या बॉलमुळे शेन वॉटसनसह अंपायर्सही झाले हैराण

आयपीएलच्या एका सीझनमध्ये कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील सामन्यादरम्यान गोलंदाज आंद्रे रसेलने शेन वॉटसनला एक अजब पद्धतीने बॉल टाकला. 

Updated: Apr 11, 2016, 02:11 PM IST
MUST WATCH : या बॉलमुळे शेन वॉटसनसह अंपायर्सही झाले हैराण title=

मुंबई : आयपीएलच्या एका सीझनमध्ये कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील सामन्यादरम्यान गोलंदाज आंद्रे रसेलने शेन वॉटसनला एक अजब पद्धतीने बॉल टाकला. या बॉलनंतर अंपायरला बराच वेळ समजले नाही की नेमके काय झाले? व्हिडीओ बातमीच्या खाली आहे.

१८व्या ओव्हरमधील तिसऱ्या चेंडूवर शेन वॉटसनकडे स्ट्राईक होता. यावेळी आंद्रे रसेल गोलंदाजी करत होता. रसेलच्या चेंडूवर खेळण्यासाठी वॉटसनने स्ट्राइक घेतला. मात्र जसे वॉटसनने त्याला पाहिले की रसेल बॉल फेकणार नाही आणि त्याचा रन-अप हळू झालाय. तो चेंडू फेकणार नाही हे पाहून वॉट,न थोडा मागे गेला. मात्र रसेलने त्यानंतरही चेंडू टाकला.

खरंतर रसेलच्या रनअपवरुन दिसत होते की तो चेंडू टाकणार नाही. मात्र त्यानंतरही त्याने चेंडू फेकला. ज्यामुळे फलंदाजी करणाऱ्या शेन वॉटसनसह अंपायरही चकित झाले. हा चेंडू नाबाद ठरवण्यात आला.