नवी दिल्ली : बीसीसीआयचे माजी प्रमुख एन. श्रीनिवासन यांचा 'गे' मुलाने सोमवारी आरोप लावला की आपल्या 'खानदाना'ला वाढविण्यासाठी त्याचे वडील त्याचे एका महिलेशी लग्न करण्यासाठी त्याच्यावर दबाव टाकत होते.
श्रीनिवासन यांचा मुलगा अश्विन श्रीनिवासन यांनी 'डीएनए' या इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत हा खळबळजनक खुलासा केला आहे.
डीएनएशी बोलताना अश्विन म्हणाला, मला वाटते की माझ्या वडिलांनी कुटुंबाच्या संपत्तीतील माझा हिस्सा मला द्यावा. तसेच माझे आयुष्य मला मना प्रमाणे जगू द्यावे. मी माझा पार्टनर अवी सोबत राहू इच्छितो. आम्हांला आमच्या इच्छेविरोधात बंधक बनविले जात आहे. माझे वडील आम्हांला त्रास देत आहेत. त्यांना वाटते की मी अवि सोबतचे संबंध संपवून टाकावेत. त्यांना वाटते की कुटुंबाला वाढविण्यासाठी मी एखाद्या महिलेशी लग्न करावे.
अश्विनने आरोप लावला की सध्या आम्हांला वडिलांनी चेन्नई येथील बोट क्लब जवळील एका घरात कैद केले आहे.
अश्विनने दिलेल्या माहितीनुसार एका पत्रात त्याच्या वडिलांनी लिहिले की ते आणि त्याची आई अश्विनला खूप प्रेम करतात. त्याने आपली कुटुंबाची जबाबदारी स्वीकारावी. आपली हिच इच्छा पूर्ण करण्यासाठी श्रीनिवासन माझ्यावर दबाव टाकत आहेत. अश्विन आणि श्रीनिवासन यांच्यात १९९८ पासून वाद सुरू आहे.
अश्विनने स्वतःला सार्वजनिक दृष्ट्या समलैंगिक घोषित केले आहे. त्यानंतर तो आपल्या वडिलांपासून वेगळा राहत आहे. अश्विन श्रीनिवासन यांचा एकुलता एक मुलगा आहे. त्याची एक बहिण असून तिचे गुरूनाथ मयप्पन याच्याशी लग्न झाले आहे. आयपीएल मॅच फिक्सिंग प्रकरणात गुरूनाथ मयप्पन दोषी ठरविण्यात आले आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.