आता भारत-पाक सिरीजसंदर्भात निर्णय नाही- सुषमा स्वराज

भारत आणि पाकिस्तान दरम्यान क्रिकेट सिरीज संदर्भात कोणताही निर्णय झाला नसल्याचे केंद्रीय परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी स्पष्ट केले आहे. नवी दिल्ली झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य करताना सांगितले. 

Updated: May 31, 2015, 07:44 PM IST
आता भारत-पाक सिरीजसंदर्भात निर्णय नाही- सुषमा स्वराज title=

नवी दिल्ली  : भारत आणि पाकिस्तान दरम्यान क्रिकेट सिरीज संदर्भात कोणताही निर्णय झाला नसल्याचे केंद्रीय परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी स्पष्ट केले आहे. नवी दिल्ली झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य करताना सांगितले. 

भविष्यात ही सिरीज होणार की नाही याबाबत बोलताना आयपीएलचे चेअरमन राजीव शुक्ला यांनी सांगितले की, अजूनही अंतीम निर्णय झालेला नाही. शुक्लानुसार या प्रकरणी अनेक मुद्द्यांवर तोडगा काढणे बाकी आहे. 

२००८ मध्ये मुंबई हल्ल्यानंतर शेजारी देश असलेल्या पाकिस्तान सोबत द्विपक्षीय क्रिकेट सीरीजचे आयोजन बंद केले होते. त्यानंतर २०१२-१३ ने छोटी सिरीजसाठी भारताने पाकला बोलावले होते. 

पाकिस्तान भारताच्या भूमीवर द्विपक्षीय संबंध सुधारण्याची तयारी करीत असल्याच्या वृत्ताचा काही दिवसांपूर्वी पाकिस्तान क्रिकेट मंडळाने इन्कार केला होता. 

बीसीसीआयशी ज्या सहमती पत्रावर हस्ताक्षर झाले त्यानुसार पहिली सिरीज यूएईमध्ये होणार असल्याचे पीसीबीने स्पष्ट केले होते. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.