मुंबई: आयपीएलची पहिली मॅच वानखेडे स्टेडियमवरच होणार असल्याचा निर्णय़ हायकोर्टानं दिलाय. मात्र 12 एप्रिलपर्यंत राज्य सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश हायकोर्टानं दिले आहेत.
आयपीएलच्या मॅचेसवरून हायकोर्टानं पुन्हा एकदा राज्य सरकार, एमसीए आणि बीसीसीआयला कडक शब्दात फटकारलंय. मॅचेस महत्त्वाच्या आहेत की माणसं असा प्रश्न हायकोर्टानं पुन्हा एकदा राज्य सरकारला केला.
तसंच जे पैसे मोजतात त्यांनाच पाणी मिळतं अशी सध्या परिस्थिती असल्याचे ताशेरेही कोर्टानं ओढले आहेत. क्रिकेटच्या सामन्यांसाठी एवढ्या मोठ्या प्रमाणातं पाणी कुठुन आणलं जातं. यामागे टँकरची लॉबी सक्रीय आहे का? असा प्रश्नही हायकोर्टानं विचारलाय.