माझ्या वडिलांच्या वक्तव्याशी माझा संबंध नाही - युवराज सिंह

युवराज सिंहचे वडील योगराज सिंह यांनी टीम इंडियाचा कॅप्टन महेंद्र सिंह धोनीवर वाईट शब्दात हल्ला चढवला होता. आपल्या वडिलांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देत युवराज सिंहनं सांगितलं की, मीडियामध्ये जे वक्तव्य आलं त्याच्याशी माझा काहीही संबंध नाही. 

Updated: Apr 8, 2015, 12:20 PM IST
माझ्या वडिलांच्या वक्तव्याशी माझा संबंध नाही - युवराज सिंह title=

बंगळुरू: युवराज सिंहचे वडील योगराज सिंह यांनी टीम इंडियाचा कॅप्टन महेंद्र सिंह धोनीवर वाईट शब्दात हल्ला चढवला होता. आपल्या वडिलांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देत युवराज सिंहनं सांगितलं की, मीडियामध्ये जे वक्तव्य आलं त्याच्याशी माझा काहीही संबंध नाही. 

युवराजनं ट्विट करत सांगितलं, जसं मी पहिलेपासूनच सांगतोय की, धोनीच्या कॅप्टन्सीमध्ये खेळणं मला खूप आवडतं. सोबतच त्याच्या कॅप्टन्सीमध्ये खेळण्यात मला काहीच हरकत नाहीय. एवढंच नव्हे तर युवराजनं सांगितलं, तो लवकरच धोनीची भेट घेणार आहे आणि त्याचं वडील झाला म्हणून अभिनंदनही करणार आहे.

एका टीव्ही इंटरव्ह्यू दरम्यान योगराज सिंहनं धोनीवर निशाणा साधत, धोनीला रावणासारखा अहंकारी म्हटलं होतं. तसंच एक दिवस त्याचा हा अहंकार नक्की मोडेल आणि तो एक-एक पैशासाठी भीक मागेल, असंही योगराज सिंह यांनी म्हटलं होतं. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.