ब्रिस्बेन : ऑस्ट्रेलिया ट्राय सिरिज तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडने ९ गडी राखून भारतावर दणदणीत विजय मिळवला. ऑस्ट्रेलियानंतर इंग्लंडकडून भारत पराभूत झाला.
भारतीय टीम बॅटींग आणि बॉलिंगमध्ये चांगली कामगिरी करु शकलेली नाही. भारताचा डाव १५३ रन्सवर ३९ ओव्हरमध्ये संपुष्टात आला. इंग्लंडसमोर छोटेशे टार्गेट होते. १ गड्याच्या बदल्यात ते पार करत टीम इंडियाला हरविले. इंग्लंडचा सलामीवर मोईन अलीला माघारी धाडण्यातच टीम इंडियाला यश आले.
इंग्लंडचा सलामीवीर इयान बेल याने ८८ धावांची तर जेम्स टेलर याने ५६ धावांची खेळी खेळत संघाला अवघ्या २७.३ षटकांमध्ये विजय मिळवून दिला.
तिरंगी मालिकेत इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाची बॅटींग पूर्णपणे कोसळली. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतीय संघाचा डाव अवघ्या १५३ रन्सवर संपुष्टात आला.
ब्रिस्बेन वन-डेमध्ये टीम इंडियाने इंग्लंडसमोर विजयासाठी १५४ रन्सचं टार्गेट ठेवलं असून इंग्लंडने पहिली विकेट गमावली आहे. मोईन अलीला ८ रन्सवर आऊट करण्यात स्टुअर्ट बिन्नीला यश आल. तत्पूर्वी टॉस जिंकून प्रथम बॅटींगला उतरलेल्या टीम इंडियाची सुरुवात खराब झाली. पहिल्याच ओव्हरमध्ये शिखर धवन केवळ एक रन काढून आऊट झाला.
स्टिवन फिन आणि जेम्स एँडरसनच्या वेगवान मा-यासमोर भारतीय बॉलर्सच काही चालला नाही. भारतीय टीम १५३ रन्सवर ऑल आऊट झाली. भारताकडून सर्वाधिक ४४ रन्स स्टुअर्ट बिन्नीने केल्या. तर धोनी ३४, रहाणे ३३ आणि रायडूने २३ रन्स केल्या. कोहली केवळ चार रन्सवर पॅव्हेलियनमध्ये परतला. फिनने ५ तर एँडरसनने ४ विकेट्स घेतल्या.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.