शाहीद आफ्रिदीचं जलद अर्धशतक

आज न्यूझीलँडच्या वेलिंग्टनमध्ये पाकिस्तानी क्रिकेटर शाहीद आफ्रिदीने जोरदार फटकेबाजी केली, शाहीदने २९ चेंडूत ६७ धावा केल्या आणि टीम इंडियाला वर्ल्डकप आधीच इशारा दिलाय.

Updated: Jan 31, 2015, 09:11 PM IST
शाहीद आफ्रिदीचं जलद अर्धशतक title=

वेलिंग्टन  : आज न्यूझीलँडच्या वेलिंग्टनमध्ये पाकिस्तानी क्रिकेटर शाहीद आफ्रिदीने जोरदार फटकेबाजी केली, शाहीदने २९ चेंडूत ६७ धावा केल्या आणि टीम इंडियाला वर्ल्डकप आधीच इशारा दिलाय.

न्यूझीलंड आणि पाकिस्तान दरम्यान खेळल्या जात असलेल्या पहिल्या वनडे सिरिजमध्ये, पाकिस्तान टीमने न्यूझीलंडसमोर फक्त २१० धावा केल्या आहेत. मात्र शाहीद आफ्रिदीने जोरदार फटकेबाजी करत, कमी चेंडूत शानदार अर्धशतक केलं.

आफ्रिदी हा आठव्या नंबरवर खेळायला आला होता, तेव्हा त्याने २९ चेंडूत ६७ धावा केल्या, आफ्रिदीने २३१ स्टाईक रेटने बॅटिंग केली.

नुकत्याच झालेल्या ६ वनडे सामन्यांमध्ये आफ्रिदीने ३ अर्धशतकं केली आहेत.  यावरून शाहिद आफ्रिदीला पुन्हा सूर गवसलाय. यामुळे टीम इंडियाच्या अडचणींमध्ये वाढ झाली असल्याचं सांगण्यात येत आहे, कारण टीम इंडियाचा वर्ल्डकपमध्ये पहिला सामना हा पाकिस्तानशी होणार आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.