लाहोर : २०१६ मध्ये भारतात होणाऱ्या टी-२० वर्ल्डकपपर्यंत पाकिस्तानचा क्रिकेटपटू शाहीद आफ्रिदी ‘पाकिस्तान टी-२०’चा कॅप्टन म्हणून नियुक्त करण्यात आलंय.
पाकिस्तानचा क्रिकेटपटू मोहम्मद हफीजनं बांग्लादेशमध्ये झालेल्या ‘टी-२० वर्ल्डकप’च्या गेल्या पर्वात खराब प्रदर्शनानंतर राजीनामा दिला होता. त्यानंतर, आफ्रिदी मोहम्मद हफीजची जागा घेणार आहे.
आफ्रिदी यापूर्वी ऑगस्ट २००९ पासून एप्रिल २०११ पर्यंत पाकिस्तानी टीमचा कॅप्टन राहिलाय. त्याच्या देखरेखीखाली पाकिस्ताननं १९ टी-२० मॅच खेळले होते. यातील आठ मॅचमध्ये पाकनं विजय मिळवला होता तर अकर मॅचमध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला होता.
मिसबाह उल हक पाकिस्तानच्या टेस्ट आणि वन डे टीमचा कॅप्टन आहे आणि तोच २०१५ च्या वर्ल्डकपपर्यंत या पदावर कायम राहण्याची अपेक्षा आहे. २०१५ साली वर्ल्डकपचं आयोजन ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड संयुक्तपणे करणार आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.