मुंबई : प्रणव धनावडे हे नाव आज इतिहासच्या पानांवर कोरलं गेलं. जगभरात क्रिकेटच्या चाहत्यांच्या ओठांवर आज कल्याणच्या प्रणवचं नावं आहे. सोशल मीडिया आणि जागतिक मीडियामध्ये प्रणवच्या हजार नंबरी खेळीचं तोंडभरून कौतुक होतंय.
बीबीसी, फॉक्सन्यूज आणि ट्विटरवर आज फक्त प्रणवच्या जबरदस्त खेळीचं कौतुक करणाऱ्या बातम्या झळकल्यात. प्रणवचं नावं ट्विटरच्या जागतिक ट्रेंडिंग लिस्टमध्ये पहिल्या क्रमांकावर होतं.
विसाव्या शतकात महाराष्ट्राच्या मातीनं क्रिकेट जगाताचा देव सचिन तेंडुलकरला जन्म दिला. तेंडुलकरनंतर तसाच दुसरा तेंडुलकर होणार नाही पण क्रिकेटच्या इतिसात नाव कोरणारा एकविसाव्या शतकातला हिरो सुद्धा याच महाराष्ट्रच्या मातीत रुजतोय हे मात्र खरं.
ट्विटवर प्रणवचं कौतुक होत आहेच मात्र त्याचबरोबर जोक्सचे ट्विटही फिरतायत.
Reporter: Do you know Pranav Dhanawade? Sharapova: Yes, that kid who scored 1000 runs *Sachin faints*
— PhD in Bakchodi !! (@Atheist_Krishna) January 5, 2016