इंग्लंडमध्ये मुंबईतील छोट्या सचिनची क्रिकेटमध्ये धूम

मुंबईत हॅरिस शिल्ड टुर्नामेंटमध्ये नाबाद 546 रन्सचा रेकॉर्ड करताना शानदार पारी खेळत मुंबईचा छोटा सचिन म्हणून ओळखला जाणारा पृथ्वी शॉने पुन्हा आपल्या कामगिरीने लक्ष वेधून घेतलेय. इंग्लंडनमध्ये भारतीय टीम अपयशी ठरली असताना पृथ्वीने इंग्लंडमध्ये चमकदार कामगिरी केलेय.

Updated: Aug 12, 2014, 02:02 PM IST
इंग्लंडमध्ये मुंबईतील छोट्या सचिनची क्रिकेटमध्ये धूम title=

लंडन :  मुंबईत हॅरिस शिल्ड टुर्नामेंटमध्ये नाबाद 546 रन्सचा रेकॉर्ड करताना शानदार पारी खेळत मुंबईचा छोटा सचिन म्हणून ओळखला जाणारा पृथ्वी शॉने पुन्हा आपल्या कामगिरीने लक्ष वेधून घेतलेय. इंग्लंडनमध्ये भारतीय टीम अपयशी ठरली असताना पृथ्वीने इंग्लंडमध्ये चमकदार कामगिरी केलेय.

यॉर्कशर लीगमध्ये क्लिथॉर्प क्रिकेट क्लबकडून खेळताना पृथ्वी शॉने चांगली कामगिरी केलेय. पृथ्वीच्या करिअरची जबाबदारी सुनील गावस्कर यांच्या प्रोफेशनल व्यवस्थापन ग्रुपने घेतली आहे. पृथ्वीने अत्यंत बिकट परिस्थितीत पहिलांदा 50 रन्स केल्यात. क्लिथॉर्पच्या घरच्या मैदानावर 205 रन्सचे टार्गेट गाठताना टीमची पडझड झाली. विकेटवर विकेट पडत गेल्या. यावेळी मुंबईच्या पृथ्वीने संघाला सावरले.

तसेच पृथ्वीने याआधी स्कॅरबर्ग क्रिकेट क्लबविरुद्ध खेळताना नाबाद 42 रन्स केल्यात. तर हारोगेट क्रिकटे क्लब विरुद्ध खेळताना बॉलिंगही केली. त्यांने यावेळी 5 विकेट घेतल्या. पृथ्वीने लिंकनशन मायनर काऊंटी दुसऱ्या श्रेणीत आणि अंडर 25 टीममधून खेळताना चांगली कामगिरी केली.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.