सुनील गावसकर यांच्या गाडीला अपघात

भारतीय क्रिकेट टीमचे माजी कॅप्टन सुनील गावसकर एका अपघातातून थोडक्यात बचावलेत. जेव्हा ही घटना घडली तेव्हा त्यांच्यासोबत इंग्लिश कमेंटेटर मार्क निकोलस हेदेखील उपस्थित होते. 

Updated: Aug 12, 2014, 01:35 PM IST
सुनील गावसकर यांच्या गाडीला अपघात title=
फाईल फोटो

मॅनचेस्टर : भारतीय क्रिकेट टीमचे माजी कॅप्टन सुनील गावसकर एका अपघातातून थोडक्यात बचावलेत. जेव्हा ही घटना घडली तेव्हा त्यांच्यासोबत इंग्लिश कमेंटेटर मार्क निकोलस हेदेखील उपस्थित होते. 

रविवारी, दुपारी टीम इंडियाचा माजी कॅप्टन सुनील गावसकर ओल्ड ट्रेफर्ड टेस्ट मॅच संपल्यानंतर मॅनचेस्टरहून लंडनला जात होते. यावेळी, गावसकर गाडीच्या मागच्या सीटवर डाव्या बाजूला बसले होते. त्यांच्या शेजारी लंडनमध्ये राहणारा त्यांचा मित्र चंद्रेश पटेल बसला होता. तर गाडीत ड्रायव्हरच्या बाजूच्या सीटवर मार्क निकोलस वर्तमानपत्र वाचत बसले होते.  

जोरात पडत असलेला पाऊस आणि वेगात जाणारी जग्वार कार असा प्रवास सुरू होता. पावसामुळे गावसकर यांनी आपल्या ड्रायव्हरला सतर्क राहण्याचा सल्लाही दिली. पण, समोरून भरधाव वेगानं आलेल्या कारला त्यांचा ड्रायव्हर चुकवू शकला नाही.

या गाडीला भरधाव येताना पाहून ड्रायव्हरनं आपली जग्वार कार उजव्या बाजुला वळवली. पण, त्याचा हा प्रयत्न फोल ठरला आणि समोरून येणारी कार ज्या बाजुला गावसकर बसले होते त्या बाजुला आदळली. सुदैवानं या अपघातात कुणीही जखमी झालेलं नाही.   

हा अपघात होण्यापूर्वी काही मिनिटं अगोदरच सुनील गावसकर यांनी आपल्या पत्नीला मार्शनीलला आपण हायवेवर असून लवकरच घरी पोहचू, असा मॅसेज केला होता.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.